पक्षनेतृत्वावर टीका करून पक्षांतर्गत तेढ निर्माण करण्याचा अमोल थोरात यांचा खटाटोप – भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांचा घणाघात

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शंकर जगताप व आमदार अश्विनी जगताप ह्यांच्या विरोधात प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल थोरात ह्यांनी व्यंगचित्र काढून घराणेशाही बाबत टीका केली आहे.याबाबत भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी निषेध व्यक्त केला आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी दखल घेऊन चिंचवड विधानसभा येथील घराणेशाही दखल घ्यावी म्हणून मुलाखत दिली असून सदर प्रकार असा आहे की अमोल थोरात हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते विनायक थोरात ह्याचे चिरंजीव असून पक्षांतर्गत कलह निर्माण करण्यासाठी बेताल वक्तव्य करून तेड निर्माण करत असून वैयक्तिक पातळीवर नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता नसलेले अमोल थोरात थेट आमदार अश्विनी जगताप व शहर अध्यक्ष शंकर जगताप ह्यांच्या विरोधात वैयक्तिक पातळीवर व्यंगचित्र काढून टिका टिपणी करून पक्षांतर्गत कलह निर्माण करत आहे.
दुसऱ्या नेत्यांच्या इशारा हून टिका टिपणी करत असून त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी ह्यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात आली असून अमोल थोरात ह्याचे चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी जगताप व शहर अध्यक्ष शंकर जगताप ह्यांच्या विरोधात वैयक्तिक नाराजी होती तर पक्षश्रेष्ठी ह्यांना वैयक्तिक पातळीवर लेखी स्वरूपात मागणी करायची होती.
सोशल मीडिया माध्यमातून वैयक्तिक टिका टिपणी कोणाच्या इशारा अमोल थोरात टिका टिपणी करत आहे त्याच्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता म्हणून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे , असे ही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.













