न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये मराठी दिन उत्साहात साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका नाझनीन शेख व शाळेतील पालक सविता काळे बाळासाहेब कांबळे, निखिल साखरे, सुनिता कांबळे, गीता साळुंखे, कांचन कांबळे, निर्मला सावंत, सुप्रिया घुगे निशा साखरे उपस्थित होते. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री सचिन कळसाईत यांच्या हस्ते कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे ,सरस्वतीचे व छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा प्रतिमाचे पूजन करण्यात आले.
शाळेतून छत्रपती शिवाजी चौक रहाटणी ते शाळा अशी ग्रंथ दिंडीचे अयोजन करण्यात आले होते. मटके संस्कार, स्वराज प्रगणे, सोहम गायकवाड या विद्यार्थ्यांनी मराठीत भाषण केले. तसेच इयत्ता चौथीचा विद्यार्थी साईराज मिटकर “गर्जा महाराष्ट्र माझा” ही कविता सादर केला. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी “गौरव महाराष्ट्राचे” गीत सादर केले, प्री-प्राईमरीच्या विद्यार्थ्यांनी “बाईपण भारी देवा” हे नृत्य सादर केले इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी “कर्मभूमी मायभूमी” आणि “नृत्य महाराष्ट्राचे” हे मराठीमध्ये गाणं म्हटले व इयत्ता पाचवी आणि सहावीच्या मुलांनी “गाणं लोककलेच लेणं” हे मराठी गीत सादर केलं. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी “गोंधळ” हे मराठी गीत सादर केले, इयत्ता चौथीच्या मुलींनी कविता सादर केली.निशा पवार आणि सचिन कळसाईत यांनी मराठी भाषा विषयाबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आरुष हिबारे यांनी “पसायदान” गाऊन कार्यक्रमाचे सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना देवरे व बबीता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.









