न्यू सिटी प्राइड स्कूलमध्ये ‘संविधान दिन’ उत्साहात

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूल रहाटणी येथे ‘भारतीय संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी संतोष जाधव (विस्तार अधिकारी पिं.चिं. म.न.पा.) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामूहिक उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार,दीपक नागरगोजे (सरचिटणीस युवा मोर्चा बी.जे.पी) विलास पोळ (सामाजिक कार्यकर्ते) युवराज प्रगणे (उद्योजक) गोरख रोकडे व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या वेळी शाळा ते छत्रपती श्री.शिवाजी महाराज चौक, विमल गार्डन, कोकणे चौक शाळा अशी संविधान दिंडी काढण्यात आली. यामध्ये पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. दिंडीत विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला. शिक्षिका मोनिकाnभाजीभाकरे, हेमा सिंग, सचिन कळसाईत, निशा पवार यांनी मराठी, हिंदी व इंग्लिशमध्ये संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. राजवीर चौधरी, गुंजन चौधरी,यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान याबद्दल माहिती सांगितली. संविधानावरती इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी नाटक बसवले होते व भारत का संविधान इयत्ता पाचवी चे विद्यार्थ्यांनी गाणे म्हणाले. धर्मवीर संभाजी गार्डन व लिनियर अर्बन गार्डन या ठिकांनी ज्येष्ठ नागरिक तेथील नागरिकांमध्ये संविधानाची जनजागृती करण्यात आली तसेच 26/11 मुंबई अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली उर्मिला ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. तृप्ती शर्मा यांनी आभार मानले.









