Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त ग्रंथदिंडी व निर्मलवारी आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून दिंडीमध्ये ग्यानबा-तुकारामचा जयघोष व हरिनामाचा जयजयकार करीत दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. हरिनामाच्या गजराने सर्वच परिसर भक्तिमय झाला होता. संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते दिंडी व ग्रंथपूजन करण्यात आले.

यावेळी ह.भ.प भंगवत गायकवाड शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, तसेच पालक विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अनेक विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठूनामाचा जयजयकार करीत, तर विद्यार्थी गळ्यात टाळ अडकवून ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली म्हणत दिंडीत सहभागी झाले होते तसेच पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश देत “झाडे लावा झाडे जगवा” अशा घोषणा देत होते ‘तुकाराम, ज्ञानेश्वर, विठ्ठल – रुक्माई’ असे अनेक वेगवेगळी वेशभूषा केलेले विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थिताचे लक्ष वेधून घेत होते.

ही दिंडी शाळेपासून शिवार चौकातून परत शाळेत आली. वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला का जातात याची नाट्य स्वरूपात सादरीकरण केले वैष्णवधर्म हा समाज प्रबोधनाचा आहे. सर्व संतांनी चांगला व सत्याचा मार्ग दाखविला याची अनेक उदाहरणे यावेळी विद्यार्थ्यांना नाटकातून सादर केली “भारुड व अभंगाचे” सादरीकरण पाहून उपस्थिताचे मन भरवून गेले होते, अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संतांचे महात्ये कळते, विद्यार्थ्यांनी संतांच्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले होते, नमस्कार भावना देवरे अभंग म्हणाले त्यानंतर अनिता रोडे यांनी‘पसायदान’ केले तसेच उपस्थित त्यांना प्रसाद वाटप केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version