ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

नोटरी हा व्यवसाय नसून एकप्रकारची सेवा – ॲड. सागर रतन चरण

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नोटरी मा. भारतीय न्यायदान व्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे. भारतीय कायदे आणि संविधान यांच्याबद्दलची निष्ठा आणि त्यांच्या चौकटीत बसून नियम कायद्यांच्या निर्देशानुसार काम करणारे विधिज्ञ याची न्यायप्रक्रीयेला मदत व्हावी नियमानुसार संचिका आणि विविध करारपत्रे आणि इतर कागदपत्रे त्यांच्या फाईल्स (संचिका) पूर्ण व्हाव्यात यासाठी न्यायालयीन प्रक्रियेच्या नियम व आवश्यकतेनुसार कागदपत्रे परिपूर्ण होण्यासाठी नोटरी यांची मदत होते. केंद्र सरकारच्या वतीने नोटरी पदी निवड होणे हा एक सन्मानच आहे आणि ती एक मोठी जबाबदारीही आहे. काही अटी पूर्तता आणि अर्हतेनंतर प्रॅक्टीसच्या अनुभवानंतर केंद्र सरकारच्या वतीने एक परीक्षा घेण्यात येते त्यातील उत्तीर्ण विधिज्ञांची त्यानंतर सन्मानपूर्वक नोटरी पदी निवड करण्यात येते.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाल्मिकी समाजा मधून प्रथम नोटरी भारत सरकार पदी ॲड. सागर रतन चरण यांची नियुक्ती झाली आहे. गेले १४ वर्षापासून पिंपरी चिंचवड पुणे शहरात ते वकली क्षेत्रात आहेत. गोरगरीब सफाई कामगार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग कामगारांचे ते मोफत काम करत आहेत. युवा समाज रत्न आणि कामगार रत्न पुरस्कार द्वारे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. विविध संघटनाचे ते कायदे सल्लागार पदावर कार्यरत आहेत तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे ते माजी उपाध्यक्ष होते व जिल्हा दक्षता समिती महाराष्ट्र शासन सदस्य आहेत. नोटरी पदी नियुक्ती झाल्यानंतर ते सफाई कामगार घरातून येत असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील कार्यरत वर्ग ४ सफाई कामगारांसाठी तो विनामूल्य करारनामे, शपथपत्र, प्रतिज्ञापत्र इत्यादी काम करतील जेणेकरून तो खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांना आदरांजली वाहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button