ताज्या घडामोडीपिंपरी

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे अभिवादन

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हितासाठी लढणारे आणि आपल्या भाषणाने अख्ख्या महाराष्ट्राला स्फूर्ती मिळवून देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
आणि १९२१ साली इंग्लंडला जाऊन भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन इंग्रजांनी दिलेली संधी नाकारून इंग्रजांची चाकरी करण्यास नकार देऊन गांधीजींच्या इंग्रज सरकारच्या विरोधातील असहकार आंदोलन चालवले असे सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज विनम्र अभिवादन करत त्यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते , उपाध्यक्ष राजेश माने, संघटक निरंजन लोखंडे, विनोद गवई,मनपा सदस्य किरण साडेकर, सलीम डांगे, अनिता मोरे, विजया पाटील, रंजना काळे, अनिता जावळे, निखिल मोरे, हेमंत जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले की, बाळासाहेबांनी १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली. ‘समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे मात्र यात मराठी माणूस मागेच राहिला, महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. असे माहाराष्ट्रातील तरूणांना रोजगानिर्मिती साठी प्रयत्न केले . महाराष्ट्रात शिवसेनेचा पहिला मेळावा १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. तेंव्हापासून आजपर्यंत परंपरा सुरू आहे .

सुभाष बाबुने कोलकत्यामध्ये तिरंगी ध्वज फडकावत विराट मोर्चाचे नेतृत्व केले, तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते जखमी झाले त्यानंतर सुभाष बाबू तुरुंगात असताना गांधीजीने इंग्रज सरकार बरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. सुभाष बाबुना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला मात्र ते इंग्रजापुढे झुकले नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button