नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा विविध विभागाच्या प्रदेशाध्यक्ष यांनी केलेल्या कार्याची आढावा बैठक

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सवित्रिबाई फुले जयंतीचे औचित्य साधत मुबंई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यलयात नुकत्याच पार पडलेल्या विधान सभा निवडणुकीचा विविध विभागच्या प्रदेश अध्यक्षनी केलेल्या कार्याचा लेखा जोखा अहवाल घेतला गेला.
सदर बैठक राज्य सभा खासदार सुनित्रा पवार ,पार्टी प्रदेश अध्यक्ष खा.सुनिल तटकरे , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व पार्टीचे सरचिटणीस आमदार शिवजीरावं गर्जे यांच्या उपस्थिती मध्ये बैठक संपन्न होत असताना सुनील तटकरे व खा. सुनित्रा पवार यांनी सखोल मार्गदर्शन करत आसताना आगमी काळात कामकजाची व्यप्ती वाढून पक्ष संघटन कसे मोठे होईल यांच्या सुचना सर्व विभागच्या प्रदेश अध्यक्षाना देऊन झालेल्या विधानसभेच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी ॲड अतिश लांडगे यांनी संविधानाची फ्रेम देऊन सन्मान केला.त्यांच्या सोबत ॲड.संजय दातीर पाटील,ॲड गोरख वाळुंज ,ॲड.रामराजे भोसले,ॲड.उमेश खंदारे,ॲड.लीना मगदूम ,ॲड.प्रसन्न लोखंडे ,ॲड फुगे,ॲड.विवेक राऊत आदी उपस्थित होते.













