ताज्या घडामोडीपिंपरीशिरूर

निवडणूक होऊन जाऊ द्या केंदूरमध्ये पहिली बैठक पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मार्गी लावणार – शिवाजीराव आढळराव पाटील

Spread the love

शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरूर प्रचार दौऱ्या दरम्यान ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या केंदूर नगरीला भेट दिली. येथिल गावातील पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केले. माता भगिणीकडून औक्षण करण्यात आले. केंद्राई माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन केले होते येथे ग्रामस्थांच्या वतीने आदर सत्कार करण्यात आले ग्रामस्थांनी पाण्याचे प्रश्न या ठिकाणी मांडले तसेच केंदूर गाव दत्तक घ्यावा अशी विनंती या ठिकाणी केली. तसेच जास्तीत जास्त मताने विजयी करु असे आश्वासन याठिकाणी देण्यात आले. जेष्ठ, तरुण आणि माता भगिनींचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी शिवाजीराव आढळराव म्हणाले,   तिर्थक्षेत्र केंदूर नगरी मध्ये किती निधी आला विद्यमान खासदाराकडून? काहीच नाही मी गेल्या पंधरा वर्षात बारा कामे केली. आणि पन्नास लाख रुपये निधी दिला आपण ज्याला निवडून देतो त्यांच्याकडून काय अपेक्षा असतात. सुखदुःखात सहभागी व्हावे समस्या सोडवावे. मी खासदार नसतानाही दिड हजार कोटींची कामे केली आहे. इलेक्शन होऊ द्या, आचारसंहिता संपू द्या. या भागात मी पहिली बैठक पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात लावेल.

या प्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर साखर कारखाना वाईस चेअरमन प्रदिप दादा वळसे पाटील, राकाँपा अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर, उपजिल्हाप्रमुख शिवसेना अनिल काशिद, माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर शंकर जांभुळकर, उद्योजक प्रदीप साकोरे, उपाध्यक्ष भाजपा शिरुर भगवानराव शेळके, अध्यक्ष शिवसेना शिरुर रामभाऊ सासवडे, सभापती पंचायत समिती राजेंद्र राजकर, अध्यक्ष उद्योग आघाडी रविंद्र गायकवाड, सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य आबासाहेब प-हाड, उपसभापती पंचायत समिती सविताताई प-हाड, सरपंच केंदूर अमोल थिटे, माजी सरपंच सुनील बापू थिटे, माजी सरपंच सुवर्णाताई थिटे, माजी उपसरपंच भाऊसाहेब क-हाड, माजी उपसरपंच अभिजीत साकोरे, माजी सरपंच अविनाश साकोरे, स्वामी विवेकानंद संस्था रामभाऊ साकोरे, चेअरमन पंडित खुडे, उपसरपंच युवराज साकोरे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button