निगडी येथील पादचारी भुयारी मार्ग ह्या ठिकाणी कै आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव द्या – सचिन काळभोर

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील पादचारी भुयारी मार्ग ह्या ठिकाणी कै आमदार लक्ष्मण जगताप ह्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाण पूल व मधुकर पवळे उड्डाण पूल ह्या ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग काम संपुर्ण झाले असून तो पादचारी भुयारी मार्ग सुरू करण्यात यावा. व त्यास कै आमदार लक्ष्मण जगताप ह्यांचे नाव देण्यात यावे.
पादचारी मार्ग आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच मोठे लाईट बल्प बसविण्यात यावेत. म्हणून मागणी करण्यात आली असून पादचारी भुयारी मार्ग काम संपुर्ण झाले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी कै आमदार लक्ष्मण भाऊ जगताप ह्यांचे पादचारी भुयारी मार्ग नामकरण करण्यात यावे असे ही निवेदनात म्हटले आहे.













