ताज्या घडामोडीपिंपरी

निगडी बसस्टॉप याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – सचिन काळभोर

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील मुंबई पुणे महामार्गावर निगडी बस स्टॉप या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व पी एम पी एल मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत निगडी बस स्टॉपवर अनेकदा मोबाईल चोरी व दागिने चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे निगडी बसस्टॉपवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, अशी मागणी भाजप शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडी बस स्टॉप या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व पीएमपीएल बस मुख्य कार्यकारी अधिकारी व वाहतूक नियंत्रण शाखेकडून सुरक्षा व्यवस्था देखरेख करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत जेणेकरून चोरीच्या घटना घडणार नाहीत. तसेच चोरीच्या घटनेला आळा बसविण्यासाठी गरज असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे ताबडतोब बसवावे, असे काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button