ताज्या घडामोडीपिंपरी
नाना काटे यांच्या तत्परतेमुळे शिवसाई लेन रस्त्यावरील MSEB चा फिडर बॉक्सला लागलेली आग आटोक्यात

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील शिवसाई लेन रस्तावरील लोटस हॅास्पीटल समोर असणाऱ्य MSEB चा फिडर बाँक्स ला आग लागली होती, ही बाब तेथे काम करत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कर्मचारी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्वरीत ही घटना विठ्ठल उर्फ नाना काटे यानां सपंर्क करून कळवली, व नाना काटे यांनी MSEB चे उपअभियंता ननवरे सर यांना फोन करून या घटनेची माहीती दिली व त्वरीत या फिडर बाँक्स वरील विद्युत सप्लाय बंद करण्यास सांगितले, व अग्निशामक विभागाला देखील फोन करून कळविले, अग्निशामक व महावितरणचे कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण मिळवले व पुढील होणारी मोठी दुर्घटना टळली.












