ताज्या घडामोडीपिंपरी
नवी सांगवी परिसरात २६ जानेवारीनिमित्त मोफत टू व्हीलर पीयूसी तपासणी व सर्टिफिकेट वाटप कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपा शहराध्यक्ष श्री शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी परिसरामध्ये २६ जानेवारी गणतंत्र दिनानिमित्त मोफत टू व्हीलर PUC तपासणी व एक वर्षांचे सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.व तसेच प्रत्येक व्यक्तीस एक पेन आणि एक रोजनिशी (डायरी) या वस्तू भेट देण्यात आल्या.
या कार्यक्रमांमध्ये नवी सांगवी परिसरातील एकूण १८५३ नागरिकांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमास जोरदार प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास विशेष सहकार्य सुदर्शन सर्व्हिस सेंटर व राजू हरिश्चंद्र ढमाले परिवार यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे नियोजन सांगवी रहाटणी भाजपा उपाध्यक्ष ललित म्हसेकर यांनी केले होते.













