ताज्या घडामोडीपिंपरी

‘नवधारा’ स्पर्धेत विश्वकर्मा इन्स्टिट्यूट, पीसीसीओई संघांची चमकदार कामगिरी

Spread the love
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे ‘नवधारा – २०२४’ या राज्यस्तरीय प्रकल्प व पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कम्प्युटर विभागात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे तर इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन विभागात पीसीसीओई, निगडी संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
    स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशास‌कीय सेवेचे सहायक संचालक डॉ. मारुती जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सासाई कंपनीचे उपाध्यक्ष केतन नवले, कि डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे संचालक अभिलाश एम. टी., आयबीएम कंपनीचे सॉफ्टवेअर आर्किटेक्ट सर्वेश पटेल, मॅग्ना इंडियाचे सिनिअर लिड इंजिनिअर भिमसेन पुरोहीत, कमिन्टेस टेक्नॉलॉजीचे मॅनेजर कृष्णा घाडगे, पबमॅटीक कंपनीचे सॉफ्टवेअर इंजिनिअर अथर्व निंबाळकर, पीसीसीसोईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख प्रा. तुषार गायकवाड, प्रा. प्रिया ओघे, प्रा. मनिषा देशपांडे, प्रा. प्रिती घुटे पाटील, प्रा. निलेश ठुबे आदी उपस्थित होते.
        या स्पर्धेमध्ये विविध विभागांमधील प्रकल्पांचा समावेश होता. समाजातील तत्कालीन अडचणींवर तंत्रज्ञानाचा वापर करून समाधान शोधण्याचे काम हे विद्यार्थी अतिशय उत्तम प्रकारे करत होते. या स्पर्धेमध्ये नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर, घरगुती कामांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित उपक्रमांचा समावेश होता. विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत राज्यातील महाविद्यालयांतील अडीचशेहून अधिक संघ आणि सुमारे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
    स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे – कॉम्प्युटर विभाग – प्रथम क्रमांक – विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे;  व्दितीय क्रमांक – (विभागून बक्षीस) एआयएसएसएमएस, पुणे व एनएमआयुईटी, पुणे, तृतीय क्रमांक – विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे;
       इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन विभाग – प्रथम क्रमांक – पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग निगडी; व्दितीय क्रमांक – श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे; तृतीय क्रमांक – विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजी, बारामती;
       मेकॅनिकल विभाग – प्रथम क्रमांक – (विभागून) पीसीसीसोईआर, रावेत, व पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजी, व्दितीय क्रमांक – (विभागून) पीसीसीओईआर, रावेत, आणि राजारामबापु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपुर, सांगली. तृतीय क्रमांक – (विभागून) आर. सी. पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपुर व एसके एनएसटीटीए मुंबई;
      सिव्हिल विभाग :- प्रथम क्रमांक – (विभागून) पीसीसीओईआर, रावेत, व डॉ. भानूबेन नानावती कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे; व्दितीय क्रमांक – बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वर्धा; तृतीय अनार्ड युनिव्हर्सिटी पुणे
    पोस्टर विभाग :- प्रथम क्रमांक – विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे; द्वितीय क्रमांक – (विभागून) पीसीसीओईआर, रावेत संघ; तृतीय क्रमांक – एमआयटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग, आळंदी, पुणे;
    विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन वाघमारे, रूपम अग्रवाल, यश उराडे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रा. प्रिया ओघे यांनी मानले.
    पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजयी संघातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button