ताज्या घडामोडीपिंपरी
‘देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा अर्थसंकल्प’ – आमदार अमित गोरखे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (दि.23 जुलै) रोजी देशाची प्रगती करणारा अर्थसंकल्प आहे. देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार अमित गोरखे यांनी दिली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांचा सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. लोकसभेतील विजयानंतर 3.0मोदी सरकारचा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असून यामध्ये त्यांनी पीएम आवास योजनेसाठी 10 लाख कोटींचे वाटप करण्यासह गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी राजावर केंद्रित असून अर्थसंकल्पात रोजगार आणि कौशल्यावर भर दिला आहे.अर्थसंकल्पात तरुणांसाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यातआलेली आहे.












