Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज ,चिंचवड या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या व प्यारा ओलंपिक मधील आंतरराष्ट्रीय जलपट्टू कु वैष्णवी विनोद जगताप वय 21, या उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, लहानपणापासूनच 75 टक्के अपंग असल्याने मला घरातून आई-वडिलांनी प्रेरणा दिली व जलतरणाची गोडी निर्माण झाली तेव्हापासून प्रॅक्टिस द्वारे व प्रचंड मेहनतीने मी ऑलम्पिक खेळेल, अशी जिद्द निर्माण करण्यासाठी वेळोवेळी शाळेने व शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिले,आई-वडिलांची योग्य साथ यामुळे मी भारताचे पॅरा ऑलिंपिक गेम मध्ये तीनदा नेतृत्व करू शकले व इंटरनॅशनल लेवलला हा गेम खेळू शकले मला महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव केला ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे, नोव्हेल शाळेने ही अनेक दिव्यांग मुलांना प्रवेश देऊन त्यांना खऱ्या अर्थाने मदतच केली आहे, सर्व शाळांनी दिव्यांग मुलांसाठी प्रवेश खुले करून त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रकाश निर्माण होईल.

संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी कुमारी वैष्णवी जगताप हिचे कौतुक केले व अशा प्रकारची प्रेरणा मुलांना मिळण्यासाठी वेळोवेळी अशाच आपल्यातीलच व्यक्तींना विद्यार्थ्यांसमोर आणले जाईल असे आश्वासन पालक व विद्यार्थ्यांना दिले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अमित गोरखे (नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ), संस्थेचे कार्यकारी संचालक श्री विलास जेऊरकर, नगरसेविका व संचालिका अनुराधा गोरखे श्री अमोल गोरखे,शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड, ,पालक संघ ,विद्यार्थी पालक वर्ग आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. इयत्ता दुसरी, तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गणतंत्र दिवसाबद्दलची थोडक्यात माहिती सर्वांना दिली.त्याचबरोबर नोवेल किड्सच्या चिमुकल्यांनी परेड सादर करून सर्व पालकांचे,विद्यार्थी आणि उपस्थित पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. इयत्ता सहावी सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीता व नृत्य सादर केले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या वैष्णवी जगताप यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी पाहायला मिळत होता.

Share.
Leave A Reply

Exit mobile version