ताज्या घडामोडीपिंपरी

त्रिवेणीनगर – तळवडे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करा – माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – त्रिवेणीनगर – तळवडे रस्त्यावर होणाऱ्या अपघाता संदर्भात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांनी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे  यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  कै. वृषाली बाजीराव भालेकर व कै.नवनाथ भानुदास गायकवाड यांचे अपघाती निधन झाले. अपघातासंदर्भात  त्यासंदर्भात पाहणी करण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशावरून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे वाहतूक विभागाचे उपायुक्त बापू बांगर , पिंपरी चिंचवड शहर अभियंता मकरंद निकम , सहशहर अभियंता ओंबासे , कार्यकारी अभियंता सिनकर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे वाहतूक नियंत्रक बापू गायकवाड, तळवडे वाहतूक विभागाचे पी.आय. सुनील टोणपे  हे अपघात स्थळावर उपस्थित राहून, तळवडे ग्रामस्थ व सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पाहणी केली.

आपल्या सूचना व मागण्या समजून घेतल्या व त्यानुसार सर्व सूचना ऐकून घेऊन पोलीस व महापालिकेच्या मार्फत सर्व सूचनांचं निरासन करून येत्या आठ दिवसांमध्ये सर्व कामे करून देण्यात येतील, असं आश्वासन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वाहतूक विभागाचे उपायुक्त बापू बांगर  व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम  व इतर अधिकारी वर्गाने सूचना व मागण्या मान्य करण्याचे कबूल केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांनी रस्ते डांबरीकरण करण्याचे त्याचप्रमाणे रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर सक्षम वाहतूक पोलीस व सक्षम वार्डन यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मदत करावी. अशा प्रकारची मागणी पोलीस अधिकारी व शहराचे अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

त्यावेळी ट्रॅफिकचे ए.सी.पी.भास्कर ढेरे यांनी तळवडे गायरान जागेची पाहणी करून त्या परिसरात नियोजित ट्रॅफिक ए.सी.पी. ऑफिस करण्यात येईल अशा प्रकारची मागणी केली.

याप्रसंगी ज्योतिबानगर इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष टीकाराम शर्मा, सचिव कीर्ती शहा, राजेश शर्मा व नीरज मंत्री उपस्थित होते.या प्रसंगी सर्व तळवडे ग्रामस्थ आजी-माजी नगरसेवक सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button