चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

तर भारत महासत्ता आणि विश्व गुरू होईल – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Spread the love

 

एच. ए. स्कूलचे हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मेकॉलेची शिक्षण पद्धती ही ब्रिटिशांचे अनुकरण करणारी आणि गुलाम घडवणारी आहे. या शिक्षण पद्धतीमुळे भारताच्या संस्कृती आणि जुन्या परंपरेवर आक्रमण झाले आहे. यामध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे. भारताला मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीतून बाहेर काढण्यासाठी नव्या शिक्षण पद्धतीचा अवलंब केला, तरच भारत महासत्ता आणि विश्वगुरू होईल. या शिक्षण व्यवस्थेत खूप दोष आहेत. आपल्याला पुन्हा समृद्ध भारत घडवायचा आहे. त्यासाठी गुलाम घडवण्याऐवजी नव्या शिक्षण पद्धतीतून ‘माणूस’ घडविला पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलची स्थापना २० जुलै १९५८ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाली होती. शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले. कला, विज्ञान, शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक जयदेव अक्कलकोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्राथमिक विभागाचे पारितोषिक वितरण माजी विद्यार्थी व कामगार नेते डॉ. कैलास कदम आणि माध्यमिक विभागाचे पारितोषिक वितरण उद्योजक अक्कलकोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मागील काळात शाळेच्या विकासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आजी-माजी शिक्षक आणि समाजाच्या विविध क्षेत्रात, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, कामगार अशा विविध क्षेत्रात ज्या माजी विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यांचा प्रभुणे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, सचिव धनंजय कुलकर्णी, मिलिंद कांबळे, डॉ. शरद आगरखेडकर, डॉ. सविता केळकर, शाळा समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे, मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शशांक परमाणे, उपाध्यक्ष गणेश गांवकर, सचिव आशिष म्हसे, समन्वयक मोहन बाबर, अशोक थोरात, विद्यार्थी प्रतिनिधी निखिल साबळे, आर्या मोटे, शिक्षक प्रतिनिधी रमेश गाढवे, उप कार्याध्यक्ष श्वेता नाईक, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष समाधान गेजगे आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्रभुणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराचे नाव उद्योग क्षेत्रामुळे जागतिक पातळीवर पोहोचले आहे. यामध्ये हिंदुस्तान अँटिबायोटिक्स शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे.

दीपा अभ्यंकर यांनी मागील काळात शाळेच्या कामगिरीचा आढावा घेतला. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.सुनील शिवले, जगदीश पवार, सूत्र संचालन आणि आभार रमेश गाढवे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button