डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्यातर्फे आभार मेळाव्याचे आयोजन

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्यातर्फे हॉटेल रागा पॅलेस या ठिकाणी आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर, महाविकास आघाडीतील घटक पक्षातील मित्र पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.
माजी आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार म्हणाले आजपर्यंत मी २४ निवडणुका पाहिल्या, परंतु “विधानसभा २०२४” निवडणूक म्हणजे लोकशाहीची हत्या झाली असं म्हणावं लागेल.पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना लीड आहे. म्हणूनच ईव्हीएम मशीन ने आपल्याला हरवले आहे अन्यथा आपण जिंकलो आहोत. जनतेला गुलाम बनवून ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. गुलामी च्या विरोधात लढलेल्या पुरोगामी नेत्यांची नाव घ्यायची आज आम्हाला लाज वाटत आहे. आपण फुले शाहू आंबेडकरांचे विचार अजूनही आत्मसात केलेले नाहीत.
लोकशाहीचे चारही स्तंभ नष्ट करण्याचे काम या ठिकाणी चालले आहे.जोपर्यंत बॅलेट पेपर वरती निवडणूक होणार नाहीत तोपर्यंत महाविकासाकडे तर्फे आंदोलन केले जाईल आणि देशाला आदर्श घालून दिला जाईल.













