डॉ. सुलक्षणा शिलवंत यांची पिंपरी गावातील संत शिरोमणी सावता महाराज मंदिराला भेट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आशीर्वाद घेण्यासाठी पिंपरी येथील संत शिरोमणी सावता माळी मंदिराला भेट दिली, नतमस्तक होऊन निवडणुकीत यशासाठी प्रार्थना केली. मंदिराच्या पुजाऱ्याने उमेदवाराला आशीर्वाद दिले आणि विजय भव म्हणत शुभेच्छा दिल्या. डॉ. सुलक्षणा यांनी मंदिरात उपस्थित भाविकांशी संवाद साधून त्यांचा पाठिंबा आणि मते मागितली. निवडून आल्यास जनतेच्या हितासाठी काम करण्याचे आश्वासन दिले व देवस्थानचे आभार मानले.
प्रचार दौऱ्यादरम्यान जय हिंद शाळेच्या रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अपेक्षा आणि गरजा जाणून घेतल्या.डॉ. सुलक्षणा म्हणाल्या अनुभव संपन्न असलेल्या या पिढीशी बोलताना बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या आणि घरातील ज्येष्ठांना छाया देणारा वटवृक्ष का संबोधले जाते याची प्रचिती आली.
*नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा*
शैक्षणिक,विषमता ,बेरोजगारी,वाढलेल्या घरांच्या किंमती आणि बेघरपणा , गुन्हेगारी आणि सार्वजनिक सुरक्षा ,पर्यावरणीय समस्या आणि प्रदूषण,स्वच्छ पाणी आणि पायाभूत सुविधा अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. अशा सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना भरघोस मतदान करून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूयात अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली
नागरिकांनी अतिशय उत्साहाने डॉ. सुलक्षणा यांच्याशी आपल्या भागातील समस्यांवर व उपाय योजनांवर चर्चा केली आणि आम्ही तुमच्या सोबत असून यंदा परिवर्तन निश्चित घडून आणू असे आश्वासन दिले. मतदारांचा उत्साही प्रतिसाद बघून आनंद झाला. एकमेकांच्या समर्थनाने व निर्णयाच्या दिशेने प्रेरित होण्याची भावना वाटते असे मत डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी व्यक्त केले.
यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.









