डॉ. रेखा भोळे यांना मिळाला रवींद्रनाथ पुरस्कार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. रेखा भोळे यांना रवींद्रनाथ पुरस्कार मिळाला.विश्वविख्यात कवी , लेखक, नाटककार, संगीतकार, दार्शनिक , समाज सुधारक , आणि चित्रकार अशा प्रसिद्ध व्यक्ती रवींद्रनाथ टागोर यांची 7 मे च्या जयंतीनिमित्त ने डॉ. रेखा भोळे यांना रवींद्रनाथ पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले.1913 ला साहित्याचा नोबेल पुरस्काराने रवींद्रनाथ टागोर यांना सन्मानित करण्यात आले होते .विलक्षण प्रतिभा शक्ती त्याना मिळालेली होती त्याच्या जीवनात 2000 पेक्षा जास्त गीत रचना त्यानी लिहिलेल्या होत्या .
भारत व बांगलादेश चे राष्ट्रगीत लिहिण्याचा गौरव पण त्याना प्राप्त झालेला होता ,अशा विलक्षण प्रतिभावंत शक्ती असलेल्या रवींद्रनाथ पुरस्काराने डॉ रेखा मोहन भोळे यांना त्याचा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी ची पावती म्हणून veyil foundation यांच्या तर्फ हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. रेखा यांच्या समर्पण सामाजिक कार्य , शैक्षणिक जागरूकता वाढवण्यात त्याचा सक्रिय सहभाग त्याच्या कामातून दिसून येत असतो ,त्याप्रमाणेच महिलांसाठी खूप मोलाचे मार्गदशन व त्याना त्याच्या पायावर उभे करण्यासाठी त्या नेहमी सक्रिय असतात .




















