ताज्या घडामोडीपिंपरी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम संपन्न 

Spread the love

 

‌ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कै गणपतराव जगताप प्रतिष्ठान पिंपळे गुरव यांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शनिवार दिनांक १३|०४|२०२४ रोजी सांयकाळी भिम गीतांचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतांचा भव्य कार्यक्रम पिंपळे गुरव येथील कै.काळूराम जगताप तलावाशेजारील मैदानावर मा.विजय उलपे यांच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या प्रथम महिला शाहीर सीमा पाटील , भीमगायक जॉली मोरे ,महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक पुण्याचा राघू अर्थात राहुल शिंदे यांच्या भरदार गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला .कार्यक्रमाच्या सुरवातीस सीमा पाटील आणि सहकलाकरानी ‘बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम शरणम् गच्छामि, संगम शरणम् गच्छामि, हे गीत गाऊन महामानवांना अभिवादन केले.

सीमा पाटील यांनी आपल्या शाहिरी आवाजात जिजाईचा शिवा आणि भिमाईचा भिवा या गीताने सुरवात करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.तसेच महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मा.राहुल शिंदे यांनी आपल्या आवाजात कोरली मी मूर्ती भीमाची , नांदंण नांदण गीत सादर करून एक उत्साहाचे वातावरण झाले. सदर कार्यक्रम मुख्य आयोजक कै.गणपतराव जगताप प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.राजेंद्रशेठ जगताप तसेच मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष मा अरुण पवार यांचे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले .

या प्रसंगी अखिल महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विजू आण्णा जगताप,राजू लोखंडे,सौ चंदाताई लोखंडे ,गौतम डोळस ,सुनील कदम,
विष्णू शेळके, प्रा.डॉ. महादेव रोकडे, प्राचार्य डॉ.आनंद दडस,कामगार नेते विश्वनाथ शिंदे,श्री.संदीपदादा राठोड .पंकज मालविया,
श्री.प्रदीप गायकवाड श्री.उदय ववले,सतीश चोरमले, सुनील इंगळे, सचिन शेलार ,सांगवी पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी ,पत्रकार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्राचार्य डॉ आनंद दडस यांनी आपल्या मनोगतात महापुरुषांच्या विचारांचे बीज प्रत्येकाने आपल्या मनात रुजविले पाहिजे.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मा.राजेंद्र जगताप यांनी आपल्या मनोगतात दरवर्षी आपण दिवाळी पहाट सारखा कार्यक्रम घेऊन या परिसरातील नागरिकांना सुमधुर गीतांची मेजवानी देत असतो पण यावर्षा पासून या महामानवाचे विचार गीत गायनाच्या माध्यमातून सर्वापर्यंत पोहचविण्यासाठी या कलाकारांना आमंत्रित करणार आहोत असे आश्वासन देऊन राजेंद्र जगताप यांनी उपस्थित सर्व भीम सैनिकांना व शिव सैनिकांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने या कअरुण पवार यांच्या वतीने उपस्थित नागरिकांना अन्न दानाचा कार्यक्रम ठेवण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र जगताप मित्र परिवार तसेच अभिषेक जगताप मित्र परिवार यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button