डॉ. डी. वाय. पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी.एड., एम. एड.),पिंपरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ.डी.वाय पाटील युनिटेक सोसायटीचे डॉ. डी. वाय. पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी.एड., एम. एड.) पिंपरी,पुणे येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सतत नाविन्याचा ध्यास असणारे व नवनविन गोष्टी करण्यास प्रेरणा देणारे आमचे प्रेरणास्थान डॉ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉ. पी. डी. पाटील सर यांच्या प्रेरणेतून व बदलत्या काळानुसार गुणवत्तापुर्ण कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करणारे डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव माननीय डॉ. सोमनाथ पाटील सरांच्या मार्गदर्शनामुळे स्नेहसंमेलन यशस्वीपणे संपन्न झाले .
संघटनात्मक कार्य करण्यास प्रबलन देणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा पाठक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये बी.एड.,एम.एड. प्रशिक्षणार्थींनी गीतगायन ,विविध सामाजिक विषयांवर कविता सादरीकरण,वैयक्तिक व समूह नृत्य सादरीकरण करुन आपला उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला .
डॉ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉ. पी. डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या संकल्प सप्ताहातील मेहेंदी ,पाककला, चित्रकला,वादविवाद ,टाकाऊपासून टिकाऊ वस्तु प्रदर्शन ,नेलआर्ट इ. विविध स्पर्धांतील विजेते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन बक्षीस वितरण करण्यात आले तसेच महाविद्यलयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . रेखा पाठक व सोनाली बालवटकर मुख्याद्यापिका अक्षरा इंटरनॅशनल स्कूल वाकड,सरोज रमन,धिरज वसावे मुख्याध्यापक पंडित दीनदयाळ माध्यमिक विद्यालय,संत तुकारामनगर इ. मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . सोनाली बालवटकर मुख्याद्यापिका अक्षरा इंटरनॅशनल स्कूल वाकड, यांनी बी.एड.च्या प्रशिक्षणार्थींना आदर्श शिक्षक कसा असावा याची माहिती दिली तर धिरज वसावे मुख्याध्यापक पंडित दीनदयाळ माध्यमिक विद्यालय यांनी इंटर्नशिप बी.एड.च्या अभ्यासक्रमातील महत्व सांगितले.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन हर्षद आढोले व श्वेता नेवासकर ,पंकज अगलदरे व देबोरा खरात यांनी केले . शिक्षक प्रतिनिधी म्हणून सांस्कृतिक विभागप्रमुख सहा.प्रा.अनिता पाटोळे ,जिमखाना सदस्य प्रमुख सहा.प्रा. रत्नमाला बाविस्कर , सहा. प्रा. अश्विनी गुल्हाने यांनी पुढाकार घेऊन कार्य केले . महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . रेखा पाठक यांच्या कुशल नेतुत्वाखाली कार्यक्रम यशश्विपणे संपन्न झाला.













