डॉ. डी. वाय. पाटील बायोटेक्नाॅलाॅजी व बायोइन्फर्मेटिक्स काॅलेजच्या एन.एस.एस. वतीने कुसगाव शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
उपक्रमाला कुसगाव ग्रामस्थांकडून कौतुक

कुसगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ . पी. डी. पाटील सर आणि प्र.कुलगुरू मा.डॉ सौ स्मिता जाधव मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्ताने नुकतेच डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ आणि डॉ. डी. वाय. पाटील बायोटेक्नाॅलाॅजी व बायोइन्फर्मेटिक्स काॅलेज ताथवडे येथील एन.एस.एस.विभागाच्यावतीने दर वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेण्यात येतात. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रति सामाजिक बांधिलकी जपत कुसगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कुसगाव जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वाचे स्वागत केले. संचालिका निलु नवाणी मॅडम व प्रकाश पाटील यांच्या हस्ते कुसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 90 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही, पेन व पुस्तके वाटप करण्यात आले, संचालिका डॉ निलु नावाणी माॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शालेय विद्यार्थ्यांच्या सोबत अनेक सांघिक खेळ घेण्यात आले व एन. एस.एस च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जतन व संवर्धन या विषयावर पथनाठ्य सादर केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण वाचवण्यासंदर्भात जनजागृतीचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमास विद्यार्थी व कुसगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सरपंच स्मिता तानाजी केदारी, ग्रामपंचायतीचे इतर सर्व सभासद, मुख्याध्यापक बाळकृष्ण शिंगाडे सर्व शिक्षक सहकारी व डॉ डी वाय पाटील बायोटेक्नाॅलाॅजी उपस्थित सर्व शिक्षक सुभयन सुर, आदिती राने, रश्मी पाठे, युवराज किणीगे, शैलेश वाठोरे उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभार मानले.













