चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीभोसरी

टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या सदस्यपदी सचिन लांडगे विजयी

Spread the love

 

– कामगारांनी सलग चौथ्यांदा दाखवला विश्वास

– निकालानंतर भंडारा उधळून केला आनंदोत्सव

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्राचा ‘कणा’ असलेल्या टाटा मोटर्स एम्प्लॉईजन युनियन सदस्यपदाच्या निवडणुकीत कामगार बंधू सचिन लांडगे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या निवडणुकीत विजयाचा ‘चौकार’ मारल्यामुळे त्यांच्यावर कामगार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाटा मोटर्स कंपनीच्या एम्प्लॉईज युनियनच्या कार्यकारिणीसाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक होत असते. या निवडणुकीकडे कामगार क्षेत्राचे लक्ष असते. कंपनीच्या पॅसेंजर्स व्हेईकल बिझनेस युनिट व कर्मर्सिअल व्हेईकल बिझनेस युनिट असे एकूण ५ हजार ३७४ कामगारांनी मतदान केले. ट्रान्स एक्सल शॉप विभागात २२५ मतदार आहेत. त्यापैकी २१९ कामगारांनी मतदानाचा अधिकार बजावला. १४२ मते घेवून कामगार बंधू सचिन लांडगे विजयी झाले आहेत.

गेल्या २५ वर्षांपासून कामगार नेते सचिन लांडगे टाटा मोटर्स कंपनीमध्ये कार्यरत असून, कामगारांनी सलग चौथ्यांदा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. लवकरच युनियनच्या नवीन कार्यकारिणीची निवड होणार आहे. निवडणुकीनंतर कामगार बंधू सचिन लांडगे आणि समर्थकांनी भंडारा उधळून आनंद साजरा केला.

टाटा मोटर्स ही पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार विश्वातील महत्त्वाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना आधार मिळाला आहे. कामगार हा या कंपनीचा मुख्य आधार असून, कामगारांच्या हक्कांसाठी युनियनच्या माध्यमातून आम्ही कायम आग्रही राहिलो आहोत. निवडणुकीत मतदान केलेल्या सर्व सहकारी कामगार बंधुंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि कामगारांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देतो.
– सचिन लांडगे, कामगार बंधू, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button