ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांच्या ‘त्रिकाल’ काव्यसंग्रहाचे १७ मे रोजी प्रकाशन

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘आई’ या कवितेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले सुप्रसिद्ध कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांच्या ‘त्रिकाल’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज हॉल येथे शुक्रवार, दिनांक १७ मे २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता संपन्न होणार आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशनसोहळा होणार असून ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत; तसेच ज्येष्ठ विडंबनकार रामदास फुटाणे, समीक्षक प्रा. डॉ. रमेश वरखेडे, कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर आणि समीक्षक प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. विनाशुल्क असलेल्या या कार्यक्रमाचा रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.














