ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाचा सामान्य कर माफ करा; न्यायालयाचे पालिकेला आदेश

Spread the love


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षण संस्थांना सामान्य कर लागू करण्याच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतलेल्या निर्णयाला ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी यांच्याकडून न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. हा खटला तब्बल 13 वर्ष चालला. न्यायालयाने महापालिकेला ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालायालाचा सामान्य कर माफ करण्याचा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती पी जी तापडिया (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर) यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी याबाबत आदेश दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी शहरातील शैक्षणिक संस्थांना सामान्य कर लागू करण्याबाबत आदेश दिला होता. मालमत्ता धारकांना ज्याप्रमाणे कर असतो, त्याच प्रमाणे शैक्षणिक संस्थांना देखील कर लावला जातो. पालिकेच्या या आदेशा विरोधात निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या संस्थेने सन 2011 मध्ये न्यायालयात धाव घेतली होती.

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय ही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांची फी आणि समाजातील नागरिकांकडून मिळणाऱ्या देणग्या यावर चालत आहे. मागील दहा वर्षांपासून संस्था तोट्यात आहे. त्यामुळे या संस्थेचा सामान्य कर माफ करण्यात यावा असा युक्तिवाद संस्थेच्या वतीने अॅड. प्रतिभा जोशी दलाल, अॅड. अर्जुन दलाल यांनी केला.

न्यायालयाने ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाचा ताळेबंद तोट्यात असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच पालिकेने शाळेला दिलेल्या कराबाबतच्या नोटीसा देखील बेकायदेशीर ठरवत ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाला लावलेला सामान्य कर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या वतीने अॅड. एम व्ही नरहरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button