जागतिक पर्यावरण दिना औचित्याने उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या १०० वृक्षांचे रोपण

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर आणि परिसरात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे ,ऑक्सिजनचा उत्तम पुरवठा करणाऱ्या स्वदेशी वाणाच्या , वड , पिंपळ , चिंच , कडुलिंब , औदुंबर , सुबाभळ या १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच , या या रोपण केलेल्या वृक्षांची निगा देखील उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे राखण्यात येणार आहे.
या विषयी अधिक माहिती देताना उन्नती सोशल फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात उन्नती सोशल फाऊंडेशन नेहमीच प्रयत्नशील असते. वाढते शहरीकरण आणि सिमेंटच्या जंगलामुळे तापमान वाढ झालेली आपल्या सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने हा उपक्रम आम्हा सर्वांनी मिळून हातात घेतला आहे. वाहनांची वाढती संख्या , प्रदूषणा ची दिवसेंदिवस वाढणारी पातळी यांमुळे स्वच्छ ऑक्सिजनयुक्त श्वास घेणे देखील अवघड होत आहे. त्यामुळे शहरातील ऑक्सिजन पुरवठा वाढवा यासाठी , आम्ही देशी वाणाच्या वड , पिंपळ , चिंच , कडुलिंब , औदुंबर , सुबाभळ या १०० वृक्षांची लागवड करून त्यांची निगा देखील राखणार आहोत.”
याप्रसंगी , विठाई वाचनालय अध्यक्ष रमेश वाणी म्हणाले ,” पर्यावरणाच्या उन्नतीसाठी उन्नती सोशल फाउंडेशन चा उपक्रम हा अतिशय अभिनव असून देशी वाहनांच्या वृक्ष लागवडीमुळे पिंपळे सौदागरच्या ऑक्सिजन पुरवठ्यात वाढच होणार आहे. नागरिकांनी देखील उन्नती सोशल फाउंडेशन राबवत असलेल्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन वृक्षांचे संगोपन करावे असे देखील मी आवाहन करतो.”
सामाजिक कार्यकर्ते दिलीप चौगुले म्हणाले , ” वाढत्या नागरिकांना मुळे नागरिकांना श्वास घेणेदेखील अवघड होत आहे. वाहनांची वाढलेली संख्या , कारखान्यातून होणारे प्रदूषण यामुळे वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. हीच , गरज ओळखून उन्नती सोशल फाउंडेशनने हा उपक्रम राबवला त्याबद्दल अध्यक्ष डॉ. कुंदाताई संजय भिसे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ”
सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण चौधरी म्हणाले , निसर्ग शास्त्रात प्रत्येक झाडाचे एक अनन्यसाधारण महत्त्व आहे विशेषत: भारतीय वृक्षांना मान्सून काळात बहर येतो आणि त्यांची वाढ जोमाने होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या वृक्षांची झालेली लागवड ही पिंपळे सौदागर वासीयांना अधिक फलदायी ठरणार आहे.”
याप्रसंगी , गणेश काटे, विजय रोकडे, विलास अहिरराव व विठाई वाचनालयाचे सदस्य , आनंद हास्य क्लबचे सदस्य आणि उन्नती सोशल फाउंडेशन चे सर्व सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













