जरांगे पाटील यांच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी आळंदी माऊली मंदिरात अभिषेक पूजा

मराठा आरक्षण देण्यास सरकारला सदबुद्धी द्यावी :- कड पाटील
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासह इतर अनेक मागण्यांसाठी उपोषणास बसले आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. जरांगे पाटलांना आरोग्य स्वास्थ्य लाभून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी शुक्रवारी ( दि. १६ ) संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात चल पादुकांवर श्रीना अभिषेख, पूजा करीत सकल मराठा समाज आळंदी सर्कल बांधवांचे वतीने साकडे घालण्यात आले. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली राहावी, त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी माऊलीं चरणी प्रार्थना यावेळी समाज बांधवांचे वतीने करण्यात आली.
यावेळी आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) रमेश पाटील, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, महाराष्ट्र राज्य कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अप्पासाहेब कड, माजी विरोधी पक्ष गटनेते डी. डी भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर, संयोजक अर्जुन मेदनकर, शशिकांतराजे जाधव, अरुण कुरे, श्रींचे पुजारी प्रफुल्ल प्रसाद, भागवत शेजुळ, मृदुल भोसले पाटील, श्रीकांत काकडे, शंकर महाराज फपाळ, जयसिंह कदम, खंडाळी ग्रामपंचायत माजी सरपंच रावसाहेब भोसले पाटील, बाबासाहेब भंडारे. बालाजी शिंदे , पत्रकार ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील, विश्वकर्मा पांचाळ महाराज, तुकाराम महाराज ताजणे, शिवाजी चव्हाण, नितीन इनामदार यांचेसह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अप्पासाहेब कड म्हणाले, श्रीना साकडे घालून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. या शिवाय राज्यातील मराठा समाज बांधवाना लवकर आरक्षण मिळावे यासाठी सरकार ला माऊलींनी सद्बुद्धी दयावी असे देखील साकडे घालण्यात आल्याचे कड पाटील यांनी सांगितले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांचे पुजारी श्रीक्षेत्रोपाध्ये प्रफुल्ल प्रसादे यांनी श्रींचे पूजेचे पौरोहित्य केले. यावेळी समाज बांधव उपस्थित होते.














