चिंचवडताज्या घडामोडी

जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे शौर्य, त्याग व कार्य प्रेरणादायी – शंकर जगताप

Spread the love

 

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या प्रभावी नेतृत्वाने ब्रिटिशांच्या विरोधात आदिवासी समाजाचे शोषण थांबवण्यासाठी लढा दिला. क्रांतीच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या संघर्षाने देशातील स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. आजच्या दिवशी आपण त्यांचे शौर्य, त्याग आणि कार्याची प्रेरणा घेणे आवश्यक आहे, अशा शब्दांत शंकर जगताप यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.

आदिवासी जणनायक, स्वातंत्र्य सेनानी व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पिंपळे गुरव येथे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी अभिवादन केले. त्यांनी आदिवासी बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी नगरसेविका उषा मुंढे, माजी नगरसेविका आशा सुपे, ललिता सातपुते, लक्ष्मीबाई बोकड, संगीता दगडे, संगीता नांगरे, संगीता रावते, आशा असवले, गौरी गोणटे, शिला भालचीम, शांता भूरकुंडे, अंजना साबळे, डॉ. सुपे, सुदाम मराडे, कृष्णा भालचीम, जावजी शेळके, बाळू शेळके, सिताराम वालकोळी, बाळू उगले, सुनील बांबळे, अक्षय भोरले, किरण शेळके, राहुल असवले, प्रतिक उगले, नागेश भालचीम, प्रकाश कांबळे, ऍड. पांडुरंग कोरके यांच्यासह सह्याद्री आदिवासी महिला विकास प्रतिष्ठान आणि आदिवासी तरुण मंडळाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना प्रथम अभिवादन करतो. त्याचे अदम्य साहस हे आमचे प्रेरणा स्रोत आहे. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन, आम्ही आमच्या आदिवासी समुदायांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत आहोत.

– शंकर जगताप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button