Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»चिंचवड विधानसभेसाठी शंकर जगताप, भाऊसाहेब भोईर, नाना काटे यांची दावेदारी मजबूत! चिंचवडमध्ये महायुतीचे पक्षच समोरासमोर येण्याची शक्यता!
चिंचवड

चिंचवड विधानसभेसाठी शंकर जगताप, भाऊसाहेब भोईर, नाना काटे यांची दावेदारी मजबूत! चिंचवडमध्ये महायुतीचे पक्षच समोरासमोर येण्याची शक्यता!

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com19 June 2024Updated:19 June 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीस काही महिने बाकी असतानाच राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीत वादळाची स्थिती निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुक ही अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या मतदार संघावर रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल काही महिन्यात वाजणार आहे. त्या अगोदरच आमदारकीसाठी भाजपचे अनेक जण रिगणात आहे. चिंचवडमध्ये भाजपचे वर्चस्व मानणारा वर्ग आहे. चिंचवड विधानसभा सभेसाठी शंकर जगताप यांनी दावेदारी मागितली आहे. शंकर जगताप यांनी मागील काही महिन्यांपूर्वी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांशी जोडले गेले. तसेच श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी चिंचवड मधून पावणेदोन लाखाच लीड घेत शंकर जगताप हे विजयाचे किंगमेकर ठरले. लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची ट्रायल होती असे म्हणणे वावगे ठरेल.शहरातील मोजकेच नेते आपल्या प्रभागापुरते मर्यादित आहे. आणि काहीं आमदारकीचे स्वप्ने पाहत असल्याचे चित्र आहे. शहराच्या प्रबळ दावेदरात शंकर जगताप, भाऊसाहेब भोईर, नाना काटे असून दुसरे कोणी ही या आमदारकीच्या रेसमध्ये दिसून येत नाही.

भाजपचे दिवंगत नेते लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्या निवडूनही आल्या.यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे नेतृत्व सिद्ध झाले. भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदाची धुरा सध्या शंकर पांडुरंग जगताप यांच्या खांद्यावर आहे.त्यांनी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शहर नेतृत्वाची धुरा शंकर जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली होती.पण महापालिका निवडणुका झाल्याच नाहीत.

पिंपरी- चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या दोन जागांवरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी मराठी नाट्य संमेलन घेऊन विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम असल्याचे पाहायला मिळाले.नाना काटे यांनी मागील चिंचवडच्या  पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीमुळे विजयाच्या जवळ असताना नाना काटे यांचा पराभव झाला. तरीही, पराभवाने न खचता नाना काटे पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. पक्ष संघटना बळकट करताना विशेषतः युवक वर्गाची संघटनात्मक बांधणी मजबूत केली. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकास कामे, नागरिकांच्या समस्या, नागरिकांच्या सुखदुःखाच्या समयी गाठीभेटी, तरुणाईचे प्रश्न सोडवणे, विविध कार्यक्रमांना हजेरी, २४ बाय ७ उपलब्ध राहत आपला दैनंदिन कार्यक्रम सुरूच ठेवला आहे.

शंकर जगताप यांनी  चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. ते पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते.लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघात भाजपमध्ये पोकळी निर्माण झाली. शंकर जगताप यांनी न डगमगता नेतृत्व करण्याची तयारी दाखविली. मात्र, ऐनवेळी शंकर यांच्याऐवजी वहिनी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्याचे पक्षश्रेष्ठींनी निर्णय दिला. परंतु, कोणतीही नाराजी व्यक्त न करता त्यांनी संपूर्ण निवडणूक एकहाती घेऊन पडद्यामागील सूत्रे हलविली.

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्यानंतर चिंचवडचा गड जगताप कुटुंबीय राखू शकणार नाही, अशी शंका भाजप व विरोधी पक्षांतील पदाधिकाऱ्यांना होती. मात्र, शंकर जगताप यांनी बंधूच्या दु:खातून स्वत:ला व कुटुंबाला तर सावरले. पण भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय ठेवून चुरशीच्या निवडणुकीतही विजयश्री खेचून आणला.

शहरातील काही इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांची पेरणी केलेली नाही, लोकांपर्यंत पोहोचणे तर दूरच राहिले असे नेते आता आमदारकीची स्वप्ने बघत आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आहेत. मात्र महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही चिंचवडवर दावा केला आहे. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगतापानांही आपण आता विधानसभेचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे. यावर भाजप कसा तोडगा काढणार, की चिंडवडमध्येही वेगळा राजकीय प्रयोग होणार, हेच आगामी काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने असंघटित मजुर,व वाहनचालकाचे आरोग्य शिबिर 
Next Article ‘कचरा’ याविषयावर आधारित जनजागृती करणारा’ ट्रॅश’लघुचित्रपटाची निर्मिती
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.