चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून ३८ नामनिर्देशन पत्रे नेले

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने काल दुपारी ३ वाजेपासून ते आज दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत १६ व्यक्तींनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून ३८ नामनिर्देशन पत्रे नेली असून आतापर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेले नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाली असून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यानुसार थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून आतापर्यंत ५३ व्यक्तींनी एकूण ११८ नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.

आतापर्यंत नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील –
शंकर पांडुरंग जगताप (भारतीय जनता पार्टी), मोरेश्वर महादु भोंडवे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), ऍड. अनिल बाबू सोनवणे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), रविराज बबन काळे (आम आदमी पार्टी), खाजाभाई खाडेलाल नदाफ (स्वराज शक्ती सेना) संतोष नागोराव सोनोने (बहुजन समाज पार्टी), तुकाराम महादू भोंडवे (भारतीय राष्ट्रीय पक्ष), संदेश दत्तात्रेय नवले (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रतिक संदेश नवले (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मयुर कैलास जयस्वाल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), गौरव शिवाजी चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), जितेंद्र प्रकाश मोटे (वंचित बहुजन आघाडी), भरत नारायण महानवर (राष्ट्रीय समाज पक्ष), गणेश सुरेश जोशी (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), तुषार उर्फ वेंकटेश गाडे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष), विठ्ठल उर्फ नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष), अमोल लक्ष्मण डंबाळे (बहुजन समाज पार्टी), सुनील रमेश जावळे ( वंचित बहुजन आघाडी), राजेंद्र आत्माराम पवार (वंचित बहुजन आघाडी), सायली किरण नढे (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष), सुभाष गोपाळराव बोधे (जनता दल धर्मनिरपेक्ष), गंगुबाई सुभाष बोधे (जनता दल धर्मनिरपेक्ष).

अपक्ष – निलेश शिवाजी रावडे, अरूण श्रीपती पवार, ऍड. संदीप गुलाब चिंचवडे, हरी तापीराम महाले, रफिक रशीद कुरेशी, संतोष श्रीमंत फुलारे, सचिन अरूण सिद्धे, नंदू गोविंद बारणे, अनिल विष्णूपंत देवगावकर, मयूर बाबू घोडके, विनायक सोपान ओव्हाळ, शिवाजी तुकाराम पांडूळे, सचिन वसंत सोनकांबळे, राहुल अभिमान राऊत, सिद्धीक ईस्माइल शेख, सतिश भास्कर काळे, रविंद्र विनायक पारधे, डॉ. अक्षय गंगाराम माने, जसविंदर सिंग इंदूपाल सिंग स्तु, राजेंद्र मारूती काटे, विशाल नंदू वाघमारे, कासिम राजासाब बागवान, भाऊसाहेब सोपानराव भोईर, अतुल गणेश समर्थ, चंद्रकांत बारकू नखाते, करण नानासाहेब गाडे, शत्रुघ्न सिताराम काटे, रुपेश रमेश शिंदे, शितल विठ्ठल काटे, मारुती साहेबराव भापकर, मिलींद मोहन फडतरे.

निवडणूक निर्णय अधिकारी
२०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button