चिंचवड मतदार संघातील विविध पोलीस स्टेशन हद्दी परिसरात नाकाबंदी व पेट्रोलिंग गस्त वाढवा – नाना काटे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड मतदार संघातील वाकड, पिंपळे सौदागर थेरगाव, पिंपळे निलख, सांगवी विविध परिसरात पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दागिने, मोबईल हिसकावने, पाकीट मारणे, घरफोडी, चोरीच्या व इतर घटनामध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली. ही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. तरी या परिसरात नाकाबंदी व पेट्रोलिंग गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सांगवी पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या परिसरात मोठ्या प्रमाणत उच्चभृ मोठ्या सोसायट्या आहेत त्यातील नागरिक वॉकिंग, खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणत येत असतात.त्यांना व तसेच इथे छोटे मोठे हॉटेल व इतर व्यवसाय असून, रात्री त्यातील कामगार, मालक घरी परतत असताना त्यांना या चोरट्यांकडून धारदार हत्यार किवा बंदुकीच्या धाकाने त्यांच्या कडील मोबईल, पर्स, दागिने व बाकीचे ऐवज लुटले जातात, त्यामुळे येथील नागरिकांच्या मध्ये याबाबत दहशत व भीतीचे वातावरण निर्माण होत असून ही खूप गंभीर बाब आहे तरी मा. निरीक्षक साहेब आपण वर नमूद घटनेस गांभीर्याने बघून योग्य त्या उपय योजना कराव्यात तसेच आपल्या पोलीस ठाणे हद्दी परिसरात नाकाबंदी व पेट्रोलिंग गस्त वाढविण्यात यावी व या चोरीच्या घटनेवर नियंत्रण आणावे, असे ही म्हटले आहे.













