चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

चिंचवड चरखा संघाकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने चिंचवड चरखा संघाकडून चिंचवड येथील उद्यानात चरखा संघाचे सत्र व सोबत सर्वधर्म प्रार्थना सभा चे आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून चालू असलेल्या चिंचवड चरखा संघाकडून गांधी जयंतीच्या निमित्ताने या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

याआधी शहरातील शनिवारी सकाळी व अनेक शाळा,महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना चरखा शिकवण्याचे प्रशिक्षण संघाद्वारे केले जाते. गांधी विचारांचा प्रचार व प्रसार रुजवण्यासाठी चरखा संघ सातत्याने कार्यरत आहे.

चरखा संघामध्ये चरखा शिकण्यासाठी परिसरातील नागरिकांसहित अनेक लहान मुलं या सत्रामध्ये येऊन त्यांनी चरखा चालवून सूत कताई केली या विशेष सत्रा मुळे नागरिक व मुलांना एक वेगळा अनुभव या माध्यमातून मिळाला. सोबतच सामाजिक समतोल आणि सर्वधर्मसमभावाची भावना मनामध्ये रुजावत सर्वधर्मीय प्रार्थना सर्वधर्मीय नागरिक बंधू-भगिनींसोबत घेण्यात आली.

या उपक्रमात चरखा संघाचे सर्व सदस्यांसमवेत कैलास कदम, एड.अनिरुद्ध कांबळे, मकरध्वज यादव, विश्वनाथ जगताप, शहाबुद्धीन शेख,अक्षय शहरकर, अमर नाणेकर, राजन नायर, बिंदू तिवारी, अरुण वानखेडेअमीन शेख, अनिश काळभोर, परिसरातील नागरिक व राजकीय नेते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मयूर जयस्वाल, गौरव चौधरी, अजय तेलंग,समीर शेख, इतर सर्व सदस्यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button