ताज्या घडामोडीपिंपरी

घरेलू कामगार दिनी श्रमप्रतिष्ठा पुरस्काराचे वितरण

Spread the love

 

आंतरराष्ट्रीय घरेलु कामगार दिन उत्साहात साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महिला महासंघातर्फे आज चिंचवड येथील कार्यालयासमोर घरेलू काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या व विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या लक्ष्मी रणदिवे, वैशाली गोंदिल या घरेलू कामगारानां श्रमप्रतिष्ठा गौरव पुरस्कार २०२४ देऊन सन्मानीत करण्यात आले.

महिला अध्यक्षा माधुरी जलमूलवार ,पुणे शहराध्यक्ष सुनीता दिलपाक, माया शेटे,अश्विनी कळमकर, उज्वला साळुंखे,यमुना वंजारी, मालन गायकवाड,वनमाला कांबळे,विजया मोरे,बदाम कांबळे,सुजाता टेकाळे, सुरेखा आढाव, रेखा शिंदे,उषा आव्हाड,दीक्षा सुरवसे,कमल पालके, मायादेवी गायकवाड, सुनंदा साबळे, सुनंदा साबळे, जया देवाडीगा
आदी सह बहुसंख्य महिला उपस्थित होते.

रज्यातील घरेलू कामगार बहुतांश असूशिक्षित व अकुशल असून परिस्थितीमुळे शिक्षण न घेणाऱ्या महिलांचा यामध्ये समावेश आहे, स्थलांतरित कामगारांची संख्या यात मोठ्या प्रमाणात आहे बहुतांश महिला दहा ते पंधरा तास काम करत असतात त्यांचे आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत आपण केलेल्या प्रयत्नातुन कोरोनात त्यानां मदत मिळाली आहे. घरेलू कामगारांना विमा संरक्षण मिळाले पाहिजे त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे त्यांच्या मुलांचे शिक्षणाला अर्थसहाय्यही मिळणे अत्यंत गरजेचे आहे मात्र ते मिळत नाही. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा लढा सुरू असून मुंबई येथे १ मार्च रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी उपसचिव यांचशी झालेल्या चर्चेनुसार शासनाने घरेलू कामगाराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यापुढेही पाठपुरावा सुरु राहिल असा निश्चय आज केला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button