ग क्षेत्रीय कार्यालयासमोर फेरीवाल्यांचे बेमुदत उपोषण सुरुवात
कारवाई थांबवून फेरीवाला कायदा अंमलबजावणीची मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रिय कार्यालयासमोर थेरगाव येथे नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज पासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले. डांगे चौक,रहाटणी फाटा, १६ नंबर आदी परिसरामध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने, दंडूके शाही पद्धतीने कारवाई करण्यात येत असून फेरीवाला प्रमाणपत्र न देता हॉकर झोनची अंमलबजावणी न करता चुकीच्या पद्धतीने कारवाई क्षत्रिय अधिकारी किशोर ननावरे करत आहेत याचा निषेध करत हे उपोषण सुरू करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रामध्ये असणाऱ्या गोरगरीब, पथारी, हातगाडी, स्टॉल ,धारकावरती अत्यंत अमानुष पद्धतीने बेकायदेशीरपणे चुकीच्या पद्धतीने कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले जात आहे . त्यांना एमएसएफ चे जवान तसेच पोलिसाकडून दंडूकेशाही पद्धतीने कारवाई करण्यात येत असून त्यांचे हातगाडीवरील माल जप्त केला जात असून हे कायद्या विरोधी आहे . त्यांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे हे अत्यंत चुकीचे असून पथविक्रेता कायद्याचा भंग होत आहे तसेच ग कार्य क्षेत्रात पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण केलेले आहे त्यांचे कडून 14 00 /- रुपये शुल्क आकारणी करण्यात आलेली आहे . त्यांना ओळखपत्र, परवाने प्रमाणपत्र देणे नियमानुसार क्रमप्राप्त असताना ते नाही देता पैशाची मागणी केली जाते .
ग क्षत्रिय कार्यालय अंतर्गत असणारे पथारी,हातगाडी,स्टॉल धारकावरील कारवाई त्वरित थांबवण्यात यावी, हॉकर्स झोन करावे, त्वरित प्रमाणपत्र द्यावे या मागण्यासाठी उपोषणकर्ते अक्का लोंढे, मंगल श्रीराम, जरीना शेख, राजेंद्र कुटकर, सलीम डांगे, नौशाद मणियार, नवनाथ जगताप हे बेमुदत उपोषण करत आहेत.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, इरफान चौधरी, निमंत्रक सुनील भोसले,महिला अध्यक्षा माधुरीताई जलमुलवार,किरण साडेकर,माऊली भोसले, कालिदास गायकवाड,रज्जाक शेख , सलीम शेख,कमल लष्करे अस्मिता होळकर,आशाबाई बंडगर, पूनम परमार, ओमकार गुंजकर, सुगलाबाई स्वामी, विजाबाई पाटोरे, अशोक पगारे,ज्योती कुंभार, गोविंद मारणे ,मच्छिंद्र साळे आदी उपस्थित होते.














