Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुरू पौर्णिमा निमित्त आळंदी रोड, वडमुख वाडी येथील श्री साई मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रविवारी पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती नंतर सनई वादनात मंगल स्नान झाले. श्री साई चरित्र पारायण प्रारंभ, सकाळी ७ वाजता श्रींची आरती करण्यात आली. ८ वाजता रुद्राभिषेक झाला. श्री साईबाबा मंदिराचे अध्यक्ष व गुरू पौर्णिमा महोत्सवाचे निमंत्रक सुभाष नेलगे यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता श्रींची माध्यान्ह आरती करण्यात आली. नंतर हजारो भाविकांनी श्री साईंचे दर्शन घेतले. सायंकाळी भजन संध्या, पालखी पूजा व मिरवणूक, सायंकाळी धुपारती आणि रात्री हरी जागर करण्यात आला. सोमवारी ( दि. २२) सकाळी सात वाजता आरती, ९ वाजता श्रींचे कीर्तन, ११ वाजता गोपाळ काला, १२ वाजता माध्यान्ह आरती, सायंकाळी दुपारती नंतर पालखी पूजा व मिरवणूक, रात्री दहा वाजता शेजारती होऊन महोत्सवाची सांगता होणार आहे. ज्या साई भक्तांना पारायण सोहळ्यात आणि जलदिंडी मध्ये सहभाग घ्यायचा असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन विश्वस्त सुभाष नेलगे यांनी केले आहे.
……………………………….

Share.
Leave A Reply

Exit mobile version