गुरुनानक जयंतीनिमित्त पिंपरी कॅम्पमधून प्रभात फेरी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सालाबादप्रमाणे यंदाही पुढच्या महिन्यात दहा तारखेला गुरुनानक जयंती आहे. त्या निमित्ताने आज पिंपरी कॅपमध्ये सकाळी प्रकाश पुरब गुरू रामदास जी यांच्या प्रतिमेचे आणि गुरू ग्रंथ साहिब यांची एका फुलांनी सजवलेल्या रथातून प्रभात फेरी काढण्यात आली.
या प्रभातफेरी मध्ये मोठ्या उत्साहात शिख आणि सिंधी बांधव एकत्र येऊन नामस्मरण करीत, भजन कीर्तन करीत सामील झाले होते ही प्रभातफेरी संत बाबा मुलसिंह दरबार पासून सुरू होऊन साई चौक ज्ञानीजी गुरुद्वारा अशोक थिएटर पाॅवर हाऊस रोड मार्गे परत संत बाबा मुलसिंह दरबार येथे समारोप झाला या मध्ये प्रामुख्याने महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या प्रभातफेरी चे आयोजन दोन्ही समाजातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते मुकेश फेरवानी, घनश्याम जी, राजेश जी, भोलेनाथ जी, रामदास जी गोपी जी आणि आतंरराष्ट्रीय सिंधी समाज संघटन या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी मनोहर जेठवानी,अजीत कंजवानी,मनोज पंजाबी आदी उपस्थित होते.













