“गुड टच, बॅड टच” बाबत न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जनजागृती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – समाजात घडणाऱ्या घटनांचा विचार करता मुलींनी आपल्या आरोग्याबरोबर सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. समाजात वावरताना न घाबरता येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना हिंमतीने केला पाहिजे. तसेच ‘गुड टच’ आणि ‘बॅड टंच’ कसे ओळखावे याविषयी मार्गदर्शन राहुल भातुकले यांनी विद्यार्थ्यांना केले.
शाळांमध्ये भविष्यातील सुजन नागरिक घडत असतात विद्यार्थ्यांची सुरक्षा हा विषय खूप सवेदनशील असून त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे याबाबत शाळेतील शिक्षकांनी सजग राहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षा बाबत आवश्यक उपायोजना करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थी सुरक्षा संवाद करणे आवश्यक आहे असे मत संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी व्यक्त केले.
शाळेतील विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शाळेतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन उर्मिला ठोंबरे यांनी केले













