ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमावळ

मावळमध्ये ठाकरे गटाकडून संजोग वाघेरेंना उमेदवारी जाहीर

Spread the love

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मावळ लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच संजोग वाघेरे यांना निवडून द्या, असे आवाहन ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा सामना होण्याची दाट शक्यता आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, इथल्या खासदाराने गद्दारी केली आहे त्याला तर आडवा करायचाच पण जे सर्वपक्षीय शेठ आहेत म्हणजे काय ज्यांचं सरकार येतं त्यांच्याकडे जायचं. कुठेही गेलं की आपलं दुकान चालू.. म्हणजे राजकारणातली दुकानदारी करणारे आहेत त्यांची दुकानं बंद करायची आहेत. मी भाजपाबाबत म्हटलं आहे की अब की बार भाजपा तडीपार ते करायचं आहे. कारण इतका खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आला नव्हता.

आम्ही तुम्हालाच निवडून देतो, परंतु संजोग वाघेरे यांनी सांगितलं की याठिकाणी ग्रामीण रूग्णालय नाहीत. त्यामुळे मला लाज वाटते की हा गद्दार कोणे एकेकाळी शिवसेनेने निवडून दिला होता. परंतु त्याला ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न सोडवता आला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी ज्यांनी विकासकामांचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी एकही काम याठिकाणी केलेलं नाही. पाण्याची समस्या आहेच, परंतु याठिकाणी एकही आरोग्य केंद्र, रूग्णालय नाही. पनवेल शहरात सामाविष्ट झालेल्या गावांमध्ये कराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. असे अनेक प्रश्न या शहरात सध्या निर्माण झाले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यात तयार आहे. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात संघटन म्हणून पुढील काळात काम करणार आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या विचाराचा उमेदवार निवडून येईल, असं संजोग वाघेरे म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button