ख्रिश्चन बांधवांचा आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील ख्रिश्चन बांधवांनी महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला. पिंपरी गाव येथील जीजस इज लॉर्ड चर्च मध्ये ख्रिश्चन बांधवांनी आमदार बनसोडे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.
यावेळी केनेथ सिल्वे, सकायना सिल्वे, निक्सन थॉमस, रूबन लॉरेन्स, राजेश कदम, नरेश दायमा, राजेश नायर आदी उपस्थित होते.
आमदार अण्णा बनसोडे यांनी ख्रिश्चन समुदायाला नेहमी सहकार्य केले आहे. आमदार बनसोडे हे कामाचा माणूस आहेत. आम्ही माणसाला पाहून मत देणार आहोत. सर्व ख्रिश्चन बांधव अण्णांच्या पाठीशी उभा आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
ख्रिश्चन बांधवांना जे सहकार्य लागेल ते आपण करू. आजवर अनेक ख्रिश्चन बांधव आपल्या सोबत काम करत आहेत. यापुढे देखील समाजासाठी काम केले जाईल, असे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले.













