ताज्या घडामोडीपिंपरीशिरूर
खेड तालुक्यातील पाईट येथील यात्रेनिमित्त शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा मालकांशी साधला संवाद

खेड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खेड तालुक्यातील पाईट येथील यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींना शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपराव मोहिते पाटील व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा मालकांशी संवाद साधला.
सामाजिक, राजकीय कारकीर्दीत बैलगाडा मालकांची मला सदैव साथ मिळाली. त्यांच्या ऋणातून उतराई होणे कदापि शक्य नाही. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी बैलगाडा मालक, शेतकरी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढलो, असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.













