ताज्या घडामोडीपिंपरीमावळ

खासदार बारणे यांनी वाहिली महामानवाला आदरांजली

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चौकातील पुतळ्यास पुष्पहार वाहून आदरांजली अर्पण केली.

खासदार बारणे यांच्या समवेत भाजपा नेते व माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, भाजपा नेते सदाशिव खाडे, नामदेव ढाके, महेश कुलकर्णी, सुजाता पलांडे, आरपीआयचे माजी शहराध्यक्ष रमेश चिमूरकर, संदिपान झोंबाडे तसेच सरिता साने, निखिल येवले, हेमचंद्र जावळे, अंकुश कोळेकर, रवींद्र ब्रह्मे, संगीता कदम, रामभाऊ सुपेकर, तुकाराम कांचन, केशव सरोदे, माऊली जगताप, अक्षय नाळे, महेश बडगुजर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार बारणे यांनी दापोडी येथे जाऊन भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी नीलेश हाके, अविनाश जाधव, दिलीप शेरखाने, स्वाती तथा माई काटे, सिकंदर सूर्यवंशी, सरिता कुंटे, ॲड. मुकुंद ओव्हाळ, प्रशांत कडलक, सुवर्णा कुटे, जास्मिन तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button