ताज्या घडामोडीपिंपरी

खान्देश मराठा पाटील समाज संघ 6 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खान्देश मराठा पाटील समाज संघ चा 6वा वर्धापनदिन समारंभ नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहर्तावर आकुर्डी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

ग. दि.माडगूळकर नाट्यगृह आकुर्डी येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे ग्रामीणचे युवा आमदार राघवेंद्र भदाणे हे होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे,
चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक राहुल कलाटे,पाटील उद्योग समूहाचे चेअरमन उद्योजक दिपक काशिनाथ पाटील, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, माजी नगरसेवक देविदास पाटील, रवींद्र सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी अनिल पवार, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ उपस्थित होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये, कर्नल रामकृष्ण रंगराव वाघ (समाजभूषण पुरस्कार), वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद सदाशिव वाघ (उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार), उपव्यवस्थापकीय संचालक सारथी अनिल पवार (उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार), संदीप पाटील (युवा उद्योजक पुरस्कार), हर्षल बोरसे (खान्देश गौरव पुरस्कार), गणेश निकम (उद्योगरत्न पुरस्कार), गुणवंत सोनवणे (खान्देश रत्न पुरस्कार), वेदांत पाटील (उद्योगरत्न पुरस्कार), प्रशांत पाटील (युवा उद्योजक पुरस्कार), हेमराज अहिरे (खान्देश रत्न पुरस्कार), सोनाली काळे (शिक्षण रत्न पुरस्कार), जितेंद पाटील (खान्देश उद्योजक पुरस्कार),
अशोक थोरात (उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार), भावेश माळी
(बालकलाकार दांडिया किंग) यांना गौरविण्यात आले.

प्रसंगी, आमदार रामदादा भदाणे यांनी युवकांना कानमंत्र दिले. सुशिक्षित युवकांनी राजकारणाकडे संधी म्हणून बघणे गरजेचे आहे. त्यांनी राजकारणात येऊन देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर भाऊ जगताप, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मनोगत व्यक्त केले. पिंपरी चिंचवडच्या जडणघडणीमध्ये खान्देशवासियांचा मोलाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार काढत संघाच्या कार्याबद्दल व विविध सामाजिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, संपूर्ण पुणे जिल्हयातून खान्देशवासिय उपस्थित होते.

खान्देश मराठा समाज संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या आयोजनात कार्याध्यक्ष उद्योजक शरद पाटील, सचिव शंकर पाटील, सल्लागार उद्योजक पंकज निकम, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, संचालक मोतीलाल भामरे, प्रदीप शिरसाठ, देविदास पाटील, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांनी मोलाची साथ दिली व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी खानदेशातील अहिराणी कलाकारांना निमंत्रित करण्यात आले होते. आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव शंकर पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल वाघ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button