ताज्या घडामोडीपिंपरी

क्रेडाई पुणे मेट्रोचे नवे अध्यक्ष म्हणून मनीष जैन यांची नियुक्ती

क्रेडाई पुणे मेट्रोने२०२५-२०२७ साठी त्यांच्या व्यवस्थापकीय समितीची केली घोषणा

Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यातील खाजगी बांधकाम व्यवसायिकांची सर्वोच्च संस्थाअसलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी २०२५-२७ या कार्यकाळासाठी मनीष जैन यांची निवड करण्यात आली आहे. रिअल इस्टेट व प्लांट बायोटेक्नॉलॉजीक्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनीयुनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न मिसिसिपी येथून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.  

क्रेडाई पुणे मेट्रोचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मनीष जैन म्हणाले, “ही भूमिका स्वीकारण्याचा मला सन्मान वाटतो आणि पुण्याच्या रिअल इस्टेटक्षेत्राच्या वाढीसाठी आणि शाश्वततेसाठी काम करण्यास मी उत्सुक आहे. क्रेडाई पुणे मेट्रोकडून विकासक, घर खरेदीदार आणि सर्व स्टेकहोल्डर्ससाठी चांगले भविष्यघडविण्यासाठी नावीन्यपूर्णता, पारदर्शकताआणि सहयोगी प्रयत्नांवर भर दिला जाईल.” 

त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अनेक महत्त्वाच्या विषयांवरलक्ष केंद्रित करणार आहे. यामध्ये पीसीएमसी (PCMC)व आजूबाजूच्या ५ किमी परिसरातील पर्यावरण मंजुरीच्या समस्या सोडवणे, पीएमआरडीएचा (PMRDA) विकास आराखडा (DP) अंतिम करणे,प्रकल्पांसाठी योग्य पाणी वाटप व मीटरिंग सुनिश्चित करणे, तसेच उद्योग सुलभतेसाठी प्रक्रियांत सुधारणा करणे यांचा समावेश आहे. तसेचबांधकाम क्षेत्रातील दर्जा,वेग आणि खर्च कार्यक्षमतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंबवाढविण्यावर भर दिला जाणार आहे. संघटनेच्या कार्यपद्धती व प्रणालींच्या सविस्तररचनेवरही ते देखील लक्ष केंद्रित करतील. 

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष मनीष जैन यांनी माजी अध्यक्ष आणि आता क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष श्री. रणजित नाईकनवरे* यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. नवीन कार्यकारिणीत _उपाध्यक्ष म्हणून अरविंद जैन, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी, आय.पी.इनामदार, नितीन न्याती, जे.पी.श्रॉफ, सचिव म्हणून अश्विन त्रिमल आणि संयुक्त सचिव म्हणून तेजराज पाटील आणि अखिल अगरवाल हे खजिनदार म्हणून असतील तसेच जनसंपर्क प्रमुख म्हणून श कपिल गांधी_ यांच्याकडे ही जबाबदारीराहील. 

व्यवस्थापकीय समितीमध्ये _संजय देशपांडे, मनीष कनेरिया, अनुप झमतानी, पुनित ओसवाल, केतन रुईकर, दिलीप मित्तल, रिंकू शेवानी, सिद्धार्थ मूर्ती, ईशान मगर, कपिल त्रिमल, सपना राठी, मिलिंद तलाठी, हिरेन परमार, आशिष जैन, भूषण पलशरे आणि भूषण पलशरे_ यांचा समावेश आहे. 

या नवीन कार्यकारिणीचा अधिकृत स्थापना चेंज ऑफ गार्ड  समारंभ २६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button