क्रांती मित्र मंडळ व पिंपळे सौदागर ग्रामस्थ यांच्या तर्फे शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर कृष्णाजी काटे यांना पिंपळे सौदागर भुषण पुरस्कार २०२४ पुरस्कार प्रदान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांती मित्र मंडळ व पिंपळे सौदागर ग्रामस्थ यांच्या तर्फे माजी नगरसेवक शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकरभाऊ कृष्णाजी काटे यांना पिंपळे सौदागर भुषण पुरस्कार २०२४ हा पुरस्कार प्रदान पिंपळे सौदागर येथील क्रांती मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ पिंपळे सौदागर यांच्या वतीने देण्यात येणारा पिंपळे सौदागर भुषण पुरस्कार २०२४ हा पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय कबड्डी खेळाडु शंकरभाऊ कृष्णाजी काटे यांना देण्यात आला असुन क्रांती मित्रं मंडळ व समस्त ग्रामस्थ पिपंळे सौदागर यांचे हा पुरस्कार देण्याचे हे दुसरे वर्षे असुन पिंपळे सौदागर मधील रहिवाशी असलेल्या व सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक,राजकीय,खेळ,उद्योग ,व्यापार, अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या नागरिकाला प्रत्येक गणेशोत्सवात मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत हा सन्मान प्रदान केला जातो.
शंकरभाऊ कृष्णाजी काटे यांनी राजकारणा बरोबरच राष्ट्रीय पातळीवर कबड्डी संघाचे कर्णधारपदाची धुराही सांभाळलेली होती.त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा खेळातील शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता.तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवकपदी निवडून आले होते.या सर्व बाबींचा विचार करून त्यांना क्रांती मंडळाने २०२४ चा पिंपळे सौदागर भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सत्कार प्रसंगी माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक नाना काटे, नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, नगरसेविका निर्मला कुटे, संजय भिसे,श्री शहाजी (मास्तर)काटे, हभप विलास काटे, विजय शेठ काटे, श्री विठ्ठल शेठ झिंजू्र्डे, हभप शशी काटे,युवा नेते उमेश काटे, मंडळाचे अध्यक्ष सुरज खंडू काटे , शिवराज अनिल काटे, मंडळाचे सर्व सदस्य, व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते !













