Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय  योग दिनानिमित मोहननगर येथे क्रांती फाउंडेशन व योग विद्या धाम यांच्या संयुक्त विद्यामानाने योग शिबीराचे आयोज़न करण्यात आले होते. योग हा समृद्ध व सकारात्मक जीवनाचा मूलमंत्र आहे.

सद्यस्थितीमध्ये योगसाधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने आम्ही २३ जून रोजी विशेष योग शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिरात योगाचार्य प्रमोद निफाड़कर व योगप्रशिक्षक श्री.वेताळे व  महादेव येसके यांनी योगाभ्यासाबद्दल मार्गदर्शन केले. परिसरातील नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version