कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑटो क्लस्टर येथे वेल्डिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (ACDRI) येथे वेल्डिंग प्रशिक्षण केंद्राच्या पहिला टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, ऑटो क्लस्टरचे संचालक दिपक महिंद्रा, व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, अमित देसाई आदी उपस्थित होते. उत्पादन क्षेत्रातील कौशल्य विकास आणि नवकल्पना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
वेल्डींग प्रशिक्षण केंद्र आधुनिक TIG, MIG आणि ARC वेल्डिंग सुविधांनी सुसज्ज असून, मायक्रो, लघु आणि मध्यम उद्योग (MSME)च्या कर्मचार्यांना वेल्डिंग तंत्रज्ञानात प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी तयार आहे. या केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, सहभागींचे मूल्यांकन करून प्रमाणपत्र जारी करण्यात येणार असून, रोजगार क्षमता वाढणार आहे.
या उपक्रमाद्वारे उद्योगात एक महत्त्वपूर्ण गरज पूर्ण होणार असून, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी उच्च-गुणवत्ता, परवडण्या योग्य प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर, बदलत्या उत्पादन क्षेत्रात स्पर्धा टिकविण्यासाठी महत्वपू
प्रशिक्षण व्यतिरिक्त, वेल्डिंग प्रशिक्षण केंद्र उद्योगाला वेल्डिंगशी संबंधित आव्हाने तोंड द्यावे लागतात. त्यांच्यासाठी मार्गदर्शन आणि उपाय प्रदान करेल. गुणवत्ता आणि नवकल्पनांच्या सर्वोच्च मानकांना पूर्ण करण्यासाठी ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने तंत्रज्ञान आणि यंत्र सामग्रीतील उद्योग तज्ञांच्या अनुभवाने समर्थित, पायाभूत सुविधांमध्ये मोठे गुंतवणूक केली आहे.
वेल्डिंग प्रशिक्षण केंद्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील कार्यबलाच्या कौशल्य आणि क्षमता वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल, असा विश्वास आहे. तसेच, उद्योगास सर्वोच्च लाभ देईल. या सुविधेसह, ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट औद्योगिक वाढीस चालना देणे, स्पर्धात्मक उत्पादन क्षेत्रात यशच्या नवीन पातक्यांवर नेण्यासाठी आवश्यक साधने आणि प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी कार्यरत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य यांनी यावेळी सांगितले.









