Spread the love

 

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, कोहिनूर ग्रुप पुरस्कृत ,कै राम गणेश गडकरी स्मृती ‘ कोहिनूर करंडक ‘ राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा दिनांक २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, येथे संपन्न झाल्या. राज्यभरातून ५४ एकांकिका प्राथमिक फेरीत सादर होऊन , अंतिम फेरीसाठी १२ एकांकिका सादर झाल्या. नाशिक, मुंबई, कोल्हापूर आणि पुणे पिंपरी चिंचवड येथून प्राथमिक फेरी पार पडली गेली होती. स्पर्धेमध्ये विविध विषय हाताळले गेले. यंदापासून स्पर्धा ही भव्य प्रमाणामध्ये आयोजित करण्यात येत आहे. प्रथम पुरस्कार एक लाख, एक हजार केले गेले असून इतर पारितोषिकांच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे .या स्पर्धेचे परीक्षण श्री देविदास आमोणकर, पणजी गोवा,  चंद्रकांत अत्रे , जळगाव आणि  संजय दखणे, अमरावती यांनी केले . स्पर्धेचा निकाल सोबत जोडला आहे . स्पर्धेचे पारितोषिक समारंभ वितरण सुप्रसिद्ध नाट्यचित्र अभिनेते  पुष्कर श्रोत्री यांच्या हस्ते ४ फेब्रुवारी रोजी पार पडला.

आपल्या प्रास्ताविकात अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी या रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेने आजवर केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचा परिचय करून दिला.

पुष्कर श्रोत्री यांनी रंगभूमीवर सातत्याने ३२ वर्षे काम केल्यामुळे मराठी रंगभूमीचे प्रयोग मला परदेशातही करता आले असे आवर्जून सांगितले .त्याचबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये काम करताना मराठी कलाकार म्हणून आदराने बघितले जाते ,हे आवर्जून सांगितले. आज कालचे रंगकर्मी रिल्स किंवा instagram वरच्या छोट्या क्लिप्स मध्ये अडकून पडल्या सारखे दिसतात, तेथे मिळणाऱ्या लाईक्स किंवा व्ह्यूज हे केवळ संख्या वाढवणारे असतात कारण दोन जीबी डेटा प्रतिदिनी मिळणाऱ्या लोकांनी त्याला प्रतिक्रिया दिलेल्या असतात. त्यातील किती लोकांना खरेच आपले काम आवडलेले असते ही शंकाच आहे. ज्या भाषेत आपल्याला काम करावयाचे आहे त्या भाषेतील समृद्ध साहित्य संपदा वाचली गेली तर आपल्याला व्यक्त होण्याला उत्तम मार्ग मिळू शकतो, त्यासाठी वाचन हे अत्यंत महत्त्वाचे आहे ,असेही प्रतिपादन श्री श्रोत्री यांनी केले. खरे तर लाइक्स प्रेक्षकांकडून मिळविण्यासाठी सातत्याने रंगभूमीवर काय नवीन शिकता येईल, काय नवीन प्रयोग करता येतील, यामुळे मिळणार आहेत ,याची मनात जाणीव ठेवा. रंगभूमी किंवा फिल्म यामध्ये आपले कौशल्य आपले लेखन हे उत्तम व्हावे ,यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संधी ही अदृश्य झोपाळ्यासारखीं असते. आपण कायम प्रयत्नांच्या उड्या मारत राहायला हवे. आपण ज्या वेळेला त्या झोपाळ्यावर बसू ,त्या वेळेला त्या संधीचा उपयोग करून आपल्याला हवे ते लक्ष गाठणे सोयीचे होते. जे करायचे त्यावर सातत्याने फोकस ठेवणे गरजेचे आहे. दुसऱ्याला पारितोषिक का मिळाले त्यापेक्षा दुसऱ्याला पारितोषिक कशामुळे मिळाले आपल्यामध्ये काय होणे आहेत हे अभ्यासणे आवश्यक आहे.
इतरांच्या सादरीकरणात लेखनात आपल्यापेक्षा काय वेगळे आहे हे बघावे.
पारितोषिक वितरण समारंभास परिषदेचे अध्यक्ष  भाऊसाहेब भोईर ,उपाध्यक्ष  किरण येवलेकर उपस्थित होते.

भाऊसाहेब भोईर यांनी प्रास्ताविक,  गौरी लोंढे यांनी निकाल वाचन व  सुहास जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे संयोजन  राजेंद्र बंग,  नरेंद्र आमले,  जयराज काळे,  संतोष रासने,  संतोष शिंदे, रूपाली पाथरे,  आकाश थिटे व  मुकेश घोडके यांनी केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version