चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

कै. सोपानराव भोईर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महिलांच्या भजन स्पर्धा आणि जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची पायाभरणी करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे कै. सोपानराव जयवंतराव भोईर यांच्या एकोणिसाव्या स्मृतिदिनानिमित्त गतवर्षीप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामधे महिलांसाठी भजन स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि नवप्रगती मित्र मंडळ यांच्या सहकार्याने ‘महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक व ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
    कॅरम स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी २९ जुलै पर्यंत नाव नोंदणी करावी. चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील कै. मनीषा भाऊसाहेब भोईर विरंगुळा केंद्र येथे कॅरम स्पर्धेचे उद्घाटन २९ जुलै रोजी सकाळी ८:३० होईल. तर महिलाच्या भजन स्पर्धेचे उद्घाटन ३१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता, मनीषा स्मृती निवास, भोईर नगर, चिंचवड (भाऊसाहेब भोईर यांचे कार्यालय) येथे होणार आहेत.
  या दोन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ ३१ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजता, मनीषा स्मृती निवास, भोईर नगर, चिंचवड (भाऊसाहेब भोईर यांचे कार्यालय) येथे होणार आहे.
  कॅरम स्पर्धेत मध्ये सहभाग घेण्यासाठी अविनाश कदम ८२३७००९०१२ आणि भजन स्पर्धेसाठी नीलम शिंदे ९५४५५५८७४८ यांच्याशी साधावा असेही आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button