कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव कधी सुरु होणार? – सचिन काळभोर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी, यमुनानगर येथील कै. मिनाताई ठाकरे जलतरण तलाव दुरुस्तीसाठीबंद ठेवण्यात आला आहे. त्याला एक वर्ष उलटले तरी दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आयुक्त शेखर सिंह यांनी यात लक्ष घालून हा तलाव नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.
सचिन काळभोर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, काळभोर यांनी प्रसिध्दीपत्रकात
म्हटले आहे की, सध्या उन्हाळा वाढला असून अशा वातावरणात दुपारी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी
नागरिक जलतरण तलावाकडे जातात. परंतु, यमुनानगर येथील कै. मिनाताई भाजपचे सचिन काळभोर यांचा आयुक्तांना प्रश्न बंद ठेवला आहे. एक वर्षापासून हा तलाव दुरुस्तीच्या नावाखाली बंद
आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ होत आहे. याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने परिसरात
घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.याठिकाणी औषध फवारणी केली जात नाही.
उन्हाळा मोठ्या प्रमाणावर वाढला असून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर झालेली आहे. त्यांना पोहण्याचा सराव
करण्यासाठी जलतरण तलाव लवकरात लवकर सुरु करावा, अशी मागणी ठाकरे जलतरण तलाव दुरुस्तीसाठी काळभोर यांनी केली आहे.













